महाराष्ट्र पोलीस भरती पेपरसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना.. 👍
महाराष्ट्र पोलीस भरती 2023Maharashtra police bharti 2023 exam |
❇️2 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस शिपाई परीक्षा करिता बसणाऱ्या प्रत्येकास या महत्वाच्या सूचना.
❇️परीक्षा केंद्रावर एक तास आधीच पोहचा म्हणजे जास्त धावपळ होत नाही तुमचे मन स्थिर असते आणि पेपरला मन स्थिर असल्यावर तुम्ही चांगलं कॉन्सन्ट्रेशन करू शकता.
❇️आधार कार्ड किंवा एखादे व्हॅलिड ओळखपत्र सोबत ठेवा दोन असल्यास उत्तम राहील
Maharashtra police bharti exam
❇️ परीक्षेचे प्रवेश पत्र व प्रवेश पत्रावर ज्या बाबी लिहिलेल्या असतील त्या खात्रीशीरपणे व्यवस्थित वाचून घ्या व प्रवेश पत्र सोबत ठेवा 'Maharashtra police bharti exam'
❇️काळा शाहीचा बॉलपेन आधी वापरलेले 2-3 पेन सोबत ठेवा थोडा डार्क शाहीचा असल्यास गोल लवकर होतो म्हणून तसा पेन घेऊन थोडा वापरून घ्या म्हणजे पेपर वर पेन सटकणार नाही
❇️आधी उत्तर तालिका मिळते तर त्यातील महिती व्यवस्तीत भरून घ्या गोल व्यवस्तीत करा त्यात चूक करू नका रोल नंबर चुकला तर तात्काळ पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून द्या
❇️ माहिती भरून झाली आता उत्तर पत्रिका मिळाल्यावर एक दोन मिनिट का होईना बारकाईने पेपरवर नजर मारून घ्या त्यावर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पेपरला टाईम पुरु शकतो किंवा कसे पेपर कोणत्या स्पीडने सोडवायचा सोपा पेपर असेल तर अतिशय हळुवार सोडवा एकही बारीक चूक होता कामा नये एक प्रश्न दोन-तीन वेळा वाचा कठीण पेपर असल्यास स्पीड जरा मेंटेन ठेवा म्हणजे वेळेच्या अभावी पेपर सुटायला नको.
❇️ टाईम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचे आहे
Police bharti 2023 exam
Maharashtra police bharti 2023 |
❇️ पेपर सोडवायला सुरू करण्याआधी पेपरची पर्यायाची सिक्वेन्स व्यवस्थित बघून घ्या कारण आपल्याला सवय असते वेगळ्या सिक्वेन्सची व त्या ठिकाणी वेगळी सिक्वेन्स येऊ शकते
⭕️हे लक्षात ठेवा⭕️
उदा :- 1) 2) 3) 4) आपण नेहमी असे सोडवतो
तिथे 1) 3)
2) 4)
❇️ पेपर सोडवायला सुरू केल्यावर सर्वात आधी जे येत आहे ते प्रश्न सोडवून घ्या जे येत नाही त्याच्यावर वेळ वाया घालू नका तर त्या प्रश्नावर थोडी बारीक प्रश्नपत्रिका टिक करून ठेवा.
❇️ तो प्रश्न आपल्या डोक्यात असतो कदाचित त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नंतर तात्काळ सुद्धा मिळू शकते.
❇️ प्रश्न कधीही शेवटपर्यंत वाचा व चारही ऑप्शन बघितल्याशिवाय गोल करू नका काही वेळा घाई घाई मध्ये तीनही ऑप्शन बरोबर असतात आणि यापैकी सर्व असं काही उत्तर असतं आणि आपण पहिलंच ऑप्शन बघून गोल करतो व आपला मार्क जातो
❇️ चुकूनही एकही मार्क जाऊ नये याची पुरेपूर काळजी घ्या
❇️ एकदा संपूर्ण प्रश्न सोडवून झाल्यावर आता आपल्याला राहिलेल्या प्रश्नांकडे वळा व ते व्यवस्थित सोडवा
❇️ नसेल जमत तर तर्क लावा उत्तर आपल्याला नक्की आठवत नेमकं उत्तर जमत नसेल तर आपण तीन ऑप्शन वगळून सुद्धा उत्तर काढू शकतो तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही प्रश्नावर बारकाईने विचार करून बरोबर नेमके उत्तर काढू शकतात
❇️ जो प्रश्न आपण सोडवत आहोत त्याच प्रश्नाचे उत्तर पत्रिकेत गोल करा चुकूनही खालीवर गोल करू नका दोनदा कन्फर्म करून घ्या असे माझे स्वतःचे ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे मेरिट गेले आहे मी दोन प्रश्न लगातार सिक्वेन्स चुकून गोल
काळे केले होते.
❇️ तुमचा अभ्यास झालेला असून तुम्हाला असं वाटत असेल की आपला अभ्यास झालेला नाही तर तसं बिलकुल मनात ठेवू नका आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे
❇️ तुमचा विजय निश्चित आहे व हा पेपर दिल्यानंतर तुमचं पुढील पूर्ण आयुष्य बदलणार आहे सकारात्मक विचार ठेवून मित्रा तू नक्की जिंकशील.
MY JOB SMARTS या youtube channel तर्फे तुम्हाला पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा.
Subscribe 👉
https://youtube.com/@myjobsmarts7529
वरील सूचना तुम्हाला थोड्या जरी आवडल्या असतील तर आपला युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका. जयहिंद.
आपला मित्र :- महाराष्ट्र पोलीस MACHINDRA BARAMATE