मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी चक्क बनला पोलीस , पण एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून तुम्हीही खूप हसाल .
आजकाल स्वतःला वेगळे समजण्यासाठी किंवा मित्र व मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना पुण्यातील औंध परिसरातून समोर आली आहे. चक्क एक तरूण मित्र मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी पोलिसांचा ड्रेस घालून फिरत होता. पण, त्याने अशी एक चूक केली आणि त्यांनतर पुर्णच प्लान फसला. या एका घटनेमुळे पुण्यातील औंध परिसरात खळबळ उडाली असून पुणे पोलीस तपास करत असल्याची माहिती , मिळाली आहे.
Pune city police news |
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी पोलीस होण्याचं नाटकच केलं. त्याने यावेळी पोलिसांचे कपडे घातले, टोपी घातली, बॅच लावल अगदी खर्या पोलिसांप्रमाणे मात्र पायात बूट घालण्याचं तो विसरलाच. पायात चप्पल घालून फिरत असल्याने पोलिसांनी त्याला पाहिले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता सगळं प्रकरण समोर आले. पोलिसांनी त्या तरुणाला विचारलं असता मी औंध पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असल्याचं सांगितलं. पण, त्याने जो ड्रेस घातला होता त्यावरून त्याचे खरे पितळे उघडे पडले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
MAHARASHTRA POLICE NEW UPDATE TODAY
अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव - यशवंत रमेश धुरी ( वय ३०, रा. तापकीर गल्ली, नडे कॉलनी, काळेवाडी) असे आहे. या प्रकरणीची तक्रार पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले यांनी चतुष्रुंगी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुण्यातील औंध परिसरात असणार्या राम नदी पुलावर रविवारी घडला आहे.
याबाबत सदर पोलिसांनी अशी माहिती दिली की, पुण्यातील औंध परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी हे खाजगी वाहने परिसरात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग करत असताना त्यांना राम नदीच्या पुलावर एक पोलीस उभा असल्याचे दिसले. त्यांना तो अनोळखी विचित्र वाटल्याने त्याला गाडी थांबवून विचारले. त्याने आपण औंध चौकीला पोलीस असल्याचे सांगितले. पण, पोलिसांना शंका आली. आपल्याच पोलीस चौकीतला पोलीस आणि आपल्यालाच माहित नाही.
पोलिसांनी त्याचे निरीक्षण केले तर त्याच्या अंगावर ड्रेस होता, पायात चप्पल होती मात्र त्याने जो ड्रेस घातला होता त्यावर म.पो. आणि टोपीवर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिलेले आढळले. त्यावरून तो खोटे बोलत असल्याचे त्यांना समजले. अधिक चौकशी केली असता तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून आपल्या मित्र आणि मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी हा गणवेश घातल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याचा अधिक तपास चालू असल्याचं सांगण्यात आलं.
No comments:
Post a Comment