आज-काल सोशल मीडियावर कोणतीही माहिती क्षणात जगभर करता येते. जगातील कोणतीही व्यक्ती ती माहिती लगेच पाहू शकतो . सोशल मीडियाचा आपल्यासाठी चांगला उपयोग तर आहेच पण वाईट सुद्धा उपयोग सध्या खूप होत आहे त्यामध्ये व्हाट्सअप फेसबुक ट्विटर युट्युब अशा अनेक सोशल नेटवर्क असलेल्या ॲपवरून किंवा इंटरनेटच्या वापर करून खूप मानवाने प्रगती केलेली आहे. तसेच त्याचा दुरुपयोग सुद्धा आजकाल खूप पाहायला मिळतो.
आपण व्हाट्सअप फेसबुक ट्विटर अशा अनेक सोशल मीडिया ॲप वरून कोणतीही माहिती पाहून ती खरी आहे असे समजतो परंतु काही समाजकंटक धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करण्यासाठी अनेक अक्षेपाहार्य पोस्ट हे टाकत असतात त्यामुळे अनेक धर्मांमध्ये वाद निर्माण होतात.
भारतच नव्हे तर इतर जगातील सर्वच देशांमध्ये सोशल मीडियाचा वापर हा दुरुपयोग करण्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी केला जात आहे त्यामध्ये दहशतवाद आतंकवाद वेगवेगळ्या ज्या समाजासाठी घातक अशा संघटना असतात त्या बऱ्यापैकी आता सोशल मीडियाचा वापर करून सर्व जाती-धर्मांमध्ये तरुणांमध्ये वृद्ध व्यक्तींमध्ये भांडणे लावण्याचे काम हे कोणत्याही स्फोटापेक्षा कमी नाही. हे आज कालच्या तरुणांनी समजले पाहिजे.
कोणत्याही पोस्टची किंवा कोणतीही लिखित माहिती ही खरी आहे की नाही याची शहानिशा न करता तरुण हे इतर ग्रुप वरती माहिती पाठवतात आणि त्यामुळे समाजामध्ये धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण होतात त्यामुळे अनेक ठिकाणी आर्थिक नुकसान तसेच माणसांना आपले जीव सुद्धा गमवावे लागत आहेत. सुशिक्षित तरुणांनी या अशा पोस्ट यांची शहानिशा करूनच पुढच्या ग्रुपमध्ये अशी माहिती पाठवावी किंवा त्यामध्ये काही आक्षेप असेल तर प्रशासनाला तशी माहिती द्यावी परस्पर ती माहिती आपल्या मित्रांना पाठवू नये.
त्यामुळे कोणतीही आक्षेपाहार्य पोस्ट इतर ग्रुप मध्ये पाठवण्याआधी दहा वेळा विचार करून मगच पाठवावी त्यामध्ये सत्यता काय आहे हे पाहून घेणे गरजेचे आहे. असे न केल्यास तुम्हाला पोलीस स्टेशनची हवा खाण्यापासून कोणीही वाचवणार नाही असे गुन्हे केल्यास खालील प्रमाणे तुम्हाला शिक्षा होऊ शकते. याची काळजी आज कालच्या तरुणांनी घेणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र आणि वायरल पोस्ट
काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच समाजकंटकांमुळे व्हाट्सअप फेसबुक ट्विटर अशा अनेक सोशल मीडिया ॲपवर समाजामध्ये भांडणे लावण्यासाठी त्यामध्ये हिंदू मुस्लिम असेल किंवा इतरही जाती जमातींमध्ये काही व्यक्ती जाणून बुजून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही ना काही आक्षेपाहार्य माहिती फोटो पोस्टर्स हे सोशल मीडियावर पाठवत असतात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असते.
अशा आक्षेपहार्य स्टेटस, पोस्टर्स, किंवा इतर माहिती जी समाजासाठी किंवा दोन धर्मांमध्ये भांडणे लावण्यासाठी ची माहिती असते ती माहिती पाठविल्यानंतर किंवा तिची शहानिशा न करता पाठविल्यास कायदेशीर कारवाई ला सामोरे जावे लागते
No comments:
Post a Comment