Showing posts with label पोलीस भरती. Show all posts
Showing posts with label पोलीस भरती. Show all posts

Sunday, June 11, 2023

HSC नंतर कोणत्याही शाखेत ऍडमिशन साठीअत्यंत महत्वाची माहिती HSC IMPORTANT DOCUMENTS

 *HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती* 


 *मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*


१. *नीट* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट

२ *नीटप्रवेश* पत्र 

३. *नीट मार्क* लिस्ट

४. मार्क मेमो १० वी

५.  सनद १० वी

६.  मार्क मेमो १२ वी

७ नँशनँलीटी सर्टीफिकेट

८. रहिवाशी प्रमाणपत्र

९. टी सी १२ वी

१०. मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस

११. आधार कार्ड

१२. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं १६ वडिलांचा

१३. मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते

१४. मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड

मागासवर्गीयां साठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे



१. जातीचे प्रमाणपत्र

२. जात वैधता प्रमाणपत्र

३. नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.


 *इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*


१. *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट

२.  MHT-CET पत्र 

३. MHT-CET मार्क  लिस्ट

४. मार्क मेमो १० वी

५.सनद १० वी

६. मार्क मेमो १२ वी

७. नँशनँलीटी सर्टीफिकेट

८. रहिवाशी प्रमाणपत्र

९. टी सी १२ वी

१०. आधार कार्ड

११.  उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं १६ वडिलांचा

१२. राष्ट्रीय बँकेतील खाते                                         १३. फोटो.


*मागासवर्गीयांसाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे*


१.जातीचे प्रमाणपत्र

२.जात वैधता प्रमाणपत्र

३.नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 

( मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२१ पर्यत लागू)


कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.


*वैद्यकीय क्षेत्र* 


*शिक्षण - एमबीबीएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि NEETप्रवेश परीक्षा 

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 


*उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका*


*शिक्षण - बीएएमएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 


*पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका*


*शिक्षण - बीएचएमएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी 


*पुढील उच्च शिक्षण - एमडी*


*शिक्षण - बीयूएमएस* 

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी.


*पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण*


*शिक्षण - बीडीएस* 

कालावधी - चार वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी


*पुढील उच्च शिक्षण - एमडीएस*


*शिक्षण - बीएससी इन नर्सिंग* 

कालावधी - चार वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET

संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी .


*पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण*


*शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच* 

कालावधी - पाच वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET

संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय 

पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 


 *शिक्षण - डिफार्म* 


कालावधी - तीन वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश 

संधी कोठे? - औषध निर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय.


*पुढील उच्च शिक्षण - बीफार्म*


*शिक्षण - बीफार्म* 

कालावधी - चार वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 

संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा 

पुढील उच्च शिक्षण - एमफार्म 


  *संरक्षण दलात प्रवेशासाठी*


केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात. 

एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात. 

वयोमर्यादा : साडेसोळा ते १९ वर्षां दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.


*अभियांत्रिकी व ऑटो मोबाईल*


*शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा* 

कालावधी - तीन वर्षे 

पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश 

संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार 

पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश

 

*शिक्षण - बीई* 

कालावधी - चार वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी 

संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा 

पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस 


*शिक्षण - बीटेक* 

कालावधी - चार वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई 

संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 

पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस 

शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी - 

कालावधी - चार वर्षे 

पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी 

शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण 

कालावधी - दोन वर्षे 

पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण 


    *कॉम्प्युटरमधील कोर्सेस* 


डीओईएसीसी "ओ' लेव्हल 

कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ 

डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी 

कालावधी - दोन वर्षे 

सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी 

कालावधी - सहा महिने 

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन 

कालावधी - तीन महिने 

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग 

कालावधी - दहा महिने 

इग्नू युनिव्हर्सिटी 

सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग 

कालावधी - एक वर्ष 


 *शिक्षण - बारावी*


*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन* 

कालावधी - एक वर्ष 

वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट 

कालावधी - दोन महिने 

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स 

कालावधी - एक वर्ष 

(फक्त मुलींसाठी) 

डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग 

कालावधी - दोन वर्षे 

गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट 

कालावधी - एक वर्ष 

प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन 

कालावधी - एक वर्ष 

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट 

कालावधी - एक वर्ष 

डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर 

कालावधी - एक वर्ष 


     *रोजगाराभिमुख कोर्सेस*

 

*शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी* 

कालावधी - तीन वर्षे 

पात्रता - बारावी (७० टक्के) 

संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड 

इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी 

उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण 

कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स 

इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर 


*शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग

कालावधी - चार वर्षे 

पात्रता - दहावी आणि बारावी पास 

संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर 

(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग 

फाउंडेशन (एनटीटीएफ) 

सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस 

कालावधी - एक वर्ष 

फॅशन टेक्‍नॉलॉजी 

कालावधी - एक वर्ष 

मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस 

कालावधी - तीन वर्षे 


*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*

 

*टूरिस्ट गाइड* 

कालावधी - सहा महिने 

डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस 

कालावधी - दीड वर्ष 

बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग 

कालावधी - तीन महिने 

बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन 

सिस्टम (एअर टिकेटिंग) 

कालावधी - एक महिना 

अप्रेन्टाईसशिप 

कालावधी - पाच महिने ते चार वर्षे 


*शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी* 

डिजिटल फोटोग्राफी 

कालावधी - एक वर्ष 

स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग 

कालावधी - एक ते तीन वर्षे 

सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी 

कालावधी - एक ते तीन वर्षे.


*बांधकाम व्यवसाय*


*शिक्षण - बीआर्च* 

कालावधी - पाच वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NATA , JEE

संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा 

पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक  


*पारंपारिक  कोर्सेस


*शिक्षण - बीएससी* 

कालावधी - तीन वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 

पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी.


*शिक्षण - बीएससी(Agri)* 

कालावधी - ४ वर्षे 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र व CET

संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय 

पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन 


*शिक्षण - बीए* 

कालावधी - तीन वर्षे 

संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 

पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी


*शिक्षण - बीकॉम* 

कालावधी - तीन वर्षे 

संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी 


*शिक्षण - बीएसएल* 

कालावधी - पाच वर्षे 

संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा 

पुढील उच्च शिक्षण - एलएलएम 


*शिक्षण - डीएड* 

कालावधी - दोन वर्षे 

प्रवेश - सीईटी आवश्‍यक 

संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक 

पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड 


*शिक्षण - बीबीए,* बीसीए,बीबीएम 

कालावधी - तीन वर्षे 

प्रवेश - सीईटी 

संधी कोठे?  औद्योगिक ,आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा 

पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए  


*फॉरेन लॅंग्वेज* 

(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, 

जॅपनीज, कोरियन) 

कालावधी: बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर 

कोर्सेसवर आधारित

*फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.*

अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा. 

विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी. 

उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा. 


अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या. 


अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा. 


इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा. 


काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा. 

बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा. 


*काही महत्त्वाची संकेतस्थळे*

१. तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन. 

(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी ) 

www.dte.org.in 


२. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी) 

www.dmer.org


३. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी) 

www.dvet.gov.in


४. पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ 

www.unipune.ac.in


५. भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई 

आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी) 

www.iitb.ac.in 


६. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण 

www.aipmt.nic.in 


७. एनडीए प्रवेश परीक्षे संबंधी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) 

www.upsc.gov.in

Thursday, May 4, 2023

पुणे. मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी चक्क बनला पोलीस , पण एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून तुम्हीही खूप हसाल

 मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी चक्क बनला पोलीस , पण एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून तुम्हीही खूप हसाल .

आजकाल स्वतःला वेगळे समजण्यासाठी किंवा मित्र व मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना पुण्यातील औंध परिसरातून समोर आली आहे. चक्क एक तरूण मित्र मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी पोलिसांचा ड्रेस घालून  फिरत होता. पण, त्याने अशी एक चूक केली आणि त्यांनतर पुर्णच प्लान फसला. या एका घटनेमुळे पुण्यातील औंध परिसरात खळबळ उडाली असून पुणे पोलीस तपास करत असल्याची माहिती , मिळाली आहे.

Pune_city_police_news
Pune city police news


      मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी पोलीस होण्याचं नाटकच केलं. त्याने यावेळी  पोलिसांचे कपडे घातले, टोपी घातली, बॅच लावल अगदी खर्या पोलिसांप्रमाणे मात्र पायात बूट घालण्याचं तो विसरलाच. पायात चप्पल घालून फिरत असल्याने पोलिसांनी त्याला पाहिले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता सगळं प्रकरण समोर आले. पोलिसांनी त्या तरुणाला विचारलं असता मी औंध पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असल्याचं सांगितलं. पण, त्याने जो ड्रेस घातला होता त्यावरून त्याचे  खरे पितळे उघडे पडले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

MAHARASHTRA POLICE NEW UPDATE TODAY 

   अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव - यशवंत रमेश धुरी ( वय ३०, रा. तापकीर गल्ली, नडे कॉलनी, काळेवाडी) असे आहे. या प्रकरणीची तक्रार पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले यांनी चतुष्रुंगी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुण्यातील औंध परिसरात असणार्‍या राम नदी पुलावर रविवारी घडला आहे.

याबाबत सदर पोलिसांनी अशी माहिती दिली की, पुण्यातील औंध परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी हे खाजगी वाहने  परिसरात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग करत असताना त्यांना राम नदीच्या पुलावर एक पोलीस उभा असल्याचे दिसले. त्यांना तो अनोळखी विचित्र वाटल्याने त्याला गाडी थांबवून विचारले. त्याने आपण औंध चौकीला पोलीस असल्याचे सांगितले. पण, पोलिसांना शंका आली. आपल्याच पोलीस चौकीतला पोलीस आणि आपल्यालाच माहित नाही.

पोलिसांनी त्याचे निरीक्षण केले तर त्याच्या अंगावर ड्रेस होता, पायात चप्पल होती मात्र त्याने जो ड्रेस घातला होता त्यावर म.पो. आणि टोपीवर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिलेले आढळले. त्यावरून तो खोटे बोलत असल्याचे त्यांना समजले. अधिक चौकशी केली असता तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून आपल्या मित्र आणि मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी हा गणवेश घातल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याचा अधिक तपास चालू असल्याचं सांगण्यात आलं.








Tuesday, April 4, 2023

पुणे शहर पोलीस भरती 2021 कट ऑफ PUNE CITY POLICE BHARTI 2 to021 GROUND CUT OFF

 

पुणे शहर पोलीस भरती 2021कट ऑफ PUNE CITY POLICE BHARTI 2021 CUT OFF 

नमस्कार मित्रांनो आज आपण या ब्लॉगमध्ये पुणे शहर पोलीस भरती 2021 एकूण रिक्त जागा 720 पदे भरण्यासाठी ही भरती घेण्यात आली. पुणे शहर भरती 2021 ग्राउंड चा कट ऑफ पाहणार आहोत प्रत्येक कास्ट नुसार हा कट-ऑफ देण्यात आलेला आहे . 

PUNE CITY POLICE BHARTI2021 CUT OFF 


PUNE CITY POLICE BHARTI CUT OFF
पुणे शहर पोलीस भरती 2021 कट ऑफ 


ग्राउंड मध्ये मिळालेले मार्क्सनुसार हा कट ऑफ जाहीर करण्यात आलेला आहे . ग्राउंड मध्ये पास झालेले उमेदवार पुरुष व महिला यांचा कट ऑफ दिलेला आहे.

एकूण - 8289 उमेदवार हे ग्राउंड मध्ये पात्र झालेले आहेत. 

हेच उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. पुणे शहर पोलीस भरती 

'Pune city police bharti new update '

पुणे शहर पोलीस भरती 2021 लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचा कट ऑफ चा चार्ट खाली देण्यात आलेला आहे. एकास दहा प्रमाणे एकूण 8289 उमेदवार हे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत.

PUNE CITY POLICE BHARTI 2021 CUT OFF
✅पुणे शहर पोलीस भरती 2021कट ऑफ 


पुणे शहर पोलीस भरती 2021कट ऑफ जाहीर

पुणे शहर पोलीस भरती 2021 चा कट ऑफ अशा प्रकारे जाहीर करण्यात आलेला आहे.

पोलीस भरती विषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपला YOUTUBE CHANNEL अवश्य भेट द्या 👉 युट्युब वर असे सर्च करा  MY JOB SMARTS त्यावर पोलीस भरती विषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेले आहेत सर्व माहिती ही मोफत आहे त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने या चॅनेलला एकदा अवश्य भेट द्या नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी शिकण्यास मिळणार आहेत. धन्यवाद.....


Sunday, April 2, 2023

नवी मुंबई पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 NAVI MUMBAI POLICE BHARTI ANSWER KEY ABCD 2023

नवी मुंबई पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 

NAVI MUMBAI POLICE BHARTI ANSWER

 KEY ABCD 2023

NAVI Mumbai Police bharti answer key
महाराष्ट्र पोलीस भरती २०२३



MY JOB SMARTS NEWS

नवी मुंबई पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023

 NAVI MUMBAI POLICE BHARTI ANSWER 

KEY ABCD 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी 
झालेल्या नवी मुंबई पोलीस भरती 2021 पेपरची उत्तर तालिका 
जाहीर झालेली आहे. 
संपूर्ण उत्तर तालिका सेट ABCD नुसार पाहणार आहोत.
Navi Mumbai Police bharti answer key 2023
       नवी मुंबई पोलीस भरती उत्तर तालिका

NAVI MUMBAI POLICE BHARTI ANSWER

 KEY ABCD 2023

👮 SET - A
Navi Mumbai Police bharti answer key set A
 प्रश्नपत्रिका कोड - A




                     
नवी मुंबई पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 
NAVI MUMBAI POLICE BHARTI 
ANSWER KEY ABCD 2023

👮 SET - B 
NAVI Mumbai Police bharti answer key set -B
प्रश्नपत्रिका कोड - B


Maharashtra police bharti 

नवी मुंबई पोलीस भरती 2021 उत्तर तालिका

👮 SET - C 
Navi Mumbai Police bharti answer key set-C
प्रश्नपत्रिका कोड - C
नवी मुंबई पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 
NAVI MUMBAI POLICE BHARTI 
ANSWER KEY ABCD 2023


👮SET -D

NAVI Mumbai Police bharti answer key set -C
प्रश्नपत्रिका कोड - D


नवी मुंबई पोलीस भरती 2021 उत्तर तालिका

अशाप्रकारे दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी ठाणे शहर
 पोलीस भरती चा पेपर झाला होता त्या पेपरची उत्तर
 पत्रिका या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुम्हाला 
माहिती आवडली असल्यास कमेंट करा तसेच 
आपला युट्युब चॅनेल MY JOB SMARTS ला एकदा
 अवश्य भेट द्या धन्यवाद 🙏

ठाणे शहर पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 THANE CITY POLICE BHARTI ANSWER KEY ABCD 2023

 ठाणे शहर पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 THANE CITY POLICE BHARTI ANSWER KEY ABCD 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी झालेल्या ठाणे शहर पोलीस भरती 2021 पेपरची उत्तर तालिका जाहीर झालेली आहे. संपूर्ण उत्तर तालिका सेट ABCD नुसार पाहणार आहोत.

THANE CITY POLICE BHARTI ANSWER KEY
ठाणे शहर पोलीस भरती
                      ठाणे शहर पोलीस भरती उत्तर तालिका


THANE CITY POLICE BHARTI ANSWER KEY ABCD 2023

👮 SET - A 

Thane city police bharti answer key set- A
                       ✅ प्रश्नपत्रिका कोड- A



ठाणे शहर पोलीस भरती उत्तर पत्रिका 2023 THANE CITY POLICE BHARTI ANSWER KEY ABCD 2023

👮 SET - B 

Thane city police bharti answer key - B
प्रश्नपत्रिका कोड -B

Maharashtra police bharti 

ठाणे शहर पोलीस भरती 2021 उत्तर तालिका
👮 SET - C 

Thane city police bharti answer key set-C
प्रश्नपत्रिका कोड - C 

👮SET -D

ठाणे शहर पोलीस भरती 2021 उत्तर तालिका


Thane city police bharti answer key set- D
✅ प्रश्नपत्रिका कोड - D


अशाप्रकारे दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी ठाणे शहर पोलीस भरती चा पेपर झाला होता त्या पेपरची उत्तर पत्रिका या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुम्हाला माहिती आवडली असल्यास कमेंट करा तसेच आपला युट्युब चॅनेल MY JOB SMARTS ला एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद 🙏

Friday, March 31, 2023

महाराष्ट्र पोलीस भरती पेपरसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना.. 👍 Maharashtra Police bharti 2023 question paper

महाराष्ट्र पोलीस भरती पेपरसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना.. 👍

महाराष्ट्र पोलीस भरती पेपरसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना..
                             महाराष्ट्र पोलीस भरती 2023


महाराष्ट्र पोलीस भरती पेपरसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना..
Maharashtra police bharti 2023 exam 


❇️2 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस शिपाई परीक्षा  करिता बसणाऱ्या प्रत्येकास या महत्वाच्या सूचना.


❇️परीक्षा केंद्रावर एक तास आधीच पोहचा म्हणजे जास्त धावपळ होत नाही तुमचे मन स्थिर असते आणि पेपरला मन स्थिर असल्यावर तुम्ही चांगलं कॉन्सन्ट्रेशन करू शकता.


❇️आधार कार्ड किंवा एखादे व्हॅलिड ओळखपत्र सोबत ठेवा दोन असल्यास उत्तम राहील 


Maharashtra police bharti exam

❇️ परीक्षेचे प्रवेश पत्र व प्रवेश पत्रावर ज्या बाबी लिहिलेल्या असतील त्या खात्रीशीरपणे व्यवस्थित वाचून घ्या व प्रवेश पत्र सोबत ठेवा 'Maharashtra police bharti exam'


❇️काळा शाहीचा बॉलपेन आधी वापरलेले 2-3 पेन सोबत ठेवा थोडा डार्क शाहीचा असल्यास गोल लवकर होतो म्हणून तसा पेन घेऊन थोडा वापरून घ्या म्हणजे पेपर वर पेन सटकणार नाही


❇️आधी उत्तर तालिका मिळते तर त्यातील महिती व्यवस्तीत भरून घ्या गोल व्यवस्तीत करा त्यात चूक करू नका रोल नंबर चुकला तर तात्काळ पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून द्या 


❇️ माहिती भरून झाली आता उत्तर पत्रिका मिळाल्यावर एक दोन मिनिट का होईना बारकाईने पेपरवर नजर मारून घ्या त्यावर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पेपरला टाईम पुरु शकतो किंवा कसे पेपर कोणत्या स्पीडने सोडवायचा सोपा पेपर असेल तर अतिशय हळुवार सोडवा एकही बारीक चूक होता कामा नये एक प्रश्न दोन-तीन वेळा वाचा कठीण पेपर असल्यास स्पीड जरा मेंटेन ठेवा म्हणजे वेळेच्या अभावी पेपर सुटायला नको.


❇️ टाईम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचे आहे 


Police bharti 2023 exam 

Maharashtra police bharti
Maharashtra police bharti 2023


❇️ पेपर सोडवायला सुरू करण्याआधी पेपरची पर्यायाची सिक्वेन्स व्यवस्थित बघून घ्या कारण आपल्याला सवय असते वेगळ्या सिक्वेन्सची व त्या ठिकाणी वेगळी सिक्वेन्स येऊ शकते


⭕️हे लक्षात ठेवा⭕️

उदा :- 1) 2) 3) 4) आपण नेहमी असे सोडवतो 


तिथे 1) 3)

        2) 4)


❇️ पेपर सोडवायला सुरू केल्यावर सर्वात आधी जे येत आहे ते प्रश्न सोडवून घ्या जे येत नाही त्याच्यावर वेळ वाया घालू नका तर त्या प्रश्नावर थोडी बारीक प्रश्नपत्रिका टिक करून ठेवा.


❇️ तो प्रश्न आपल्या डोक्यात असतो कदाचित त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नंतर तात्काळ सुद्धा मिळू शकते.


❇️ प्रश्न कधीही शेवटपर्यंत वाचा व चारही ऑप्शन बघितल्याशिवाय गोल करू नका काही वेळा घाई घाई मध्ये तीनही ऑप्शन बरोबर असतात आणि यापैकी सर्व असं काही उत्तर असतं आणि आपण पहिलंच ऑप्शन बघून गोल करतो व आपला मार्क जातो


❇️ चुकूनही एकही मार्क जाऊ नये याची पुरेपूर काळजी घ्या


❇️ एकदा संपूर्ण प्रश्न सोडवून झाल्यावर आता आपल्याला राहिलेल्या प्रश्नांकडे वळा व ते व्यवस्थित सोडवा


❇️ नसेल जमत तर तर्क लावा उत्तर आपल्याला नक्की आठवत नेमकं उत्तर जमत नसेल तर आपण तीन ऑप्शन वगळून सुद्धा उत्तर काढू शकतो तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही प्रश्नावर बारकाईने विचार करून बरोबर नेमके उत्तर काढू शकतात


❇️ जो प्रश्न आपण सोडवत आहोत त्याच प्रश्नाचे उत्तर पत्रिकेत गोल करा चुकूनही खालीवर गोल करू नका दोनदा कन्फर्म करून घ्या असे माझे स्वतःचे ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे मेरिट गेले आहे मी दोन प्रश्न लगातार सिक्वेन्स चुकून गोल

काळे केले होते.


❇️ तुमचा अभ्यास झालेला असून तुम्हाला असं वाटत असेल की आपला अभ्यास झालेला नाही तर तसं बिलकुल मनात ठेवू नका आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे


❇️ तुमचा विजय निश्चित आहे व हा पेपर दिल्यानंतर तुमचं पुढील पूर्ण आयुष्य बदलणार आहे सकारात्मक विचार ठेवून मित्रा तू नक्की जिंकशील.


MY JOB SMARTS या youtube channel तर्फे तुम्हाला पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा.

Subscribe 👉

https://youtube.com/@myjobsmarts7529

वरील सूचना तुम्हाला थोड्या जरी आवडल्या असतील तर आपला युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका. जयहिंद.


आपला मित्र :- महाराष्ट्र पोलीस  MACHINDRA BARAMATE 

Tuesday, March 28, 2023

महाराष्ट्र पोलीस भरती 2023 Maharashtra police bharti question paper

                 🥇 MY JOB SMARTS 🥇

महाराष्ट्र पोलीस भरती 2023 Maharashtra police bharti question paper

                  MPSC, पोलीस भरती, तलाठी सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचे imp प्रश्न

               ❇️ परीक्षेसाठी महत्वाचे ❇️

Maharashtra police bharti
Maharashtra police bharti 2023


◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक

◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच

◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच

◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच

◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती

◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी

महाराष्ट्र पोलीस भरती 2023 Maharashtra police bharti question paper


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी

◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO

◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष

◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


महाराष्ट्र पोलीस भरती 2023 Maharashtra police bharti question paper

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी

◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 

◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी

◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त

◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर

◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त