Saturday, May 27, 2023

कला शाखेतून १२ वी उत्तीर्ण झाला आहात..? 👉🏻 मग हे पर्याय निवडा आणि तुमचे करिअर बनवा...

 ⭕💐 *कला शाखेतून १२ वी उत्तीर्ण झाला आहात..?* 


👉🏻 *हे पर्याय निवडा आणि तुमचे करिअर बनवा...*


▪️अनेकांना १२ वी चा निकाल लागल्यानंतर पुढे काय करावे असा प्रश्न पडतो. काही विद्यार्थांना डिग्री कोर्सेस ( Degree Courses) बद्दल काहीच माहिती नसते. विद्यार्थांना अनेक जणांना कडून पुढे काय काय करायचं याचे सल्ले मिळतच असतात पण ते काही विद्यार्थांसाठी पुरेसे नसतात. काही लोकांचा असा समज आहे की फक्त विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे करिअर उत्तम होते. पण असे काही नाही कला शाखेतील विद्यार्थांसाठी देखील करिअर चे अनेक उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध आहे. १२ वी नंतर विद्यार्थी कोणत्या पर्यायाची निवड करतील हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. त्याचेकारण म्हणजे या पर्यायावर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते. त्यामूळे आम्ही तुम्हाला कला शाखेतील १२ वी नंतरच्या महत्त्वाच्या कोर्सेस ची माहीत देणार आहोत.

12 वी नंतर काय?
12 वी पास नंतर काय ?



👉🏻 *१) बी फ ए ( B.A.F)*


▪️बी फ ए (B.A.F) चा संपूर्ण फुल फॉर्म बॅचलर ऑफ फाईन आर्टस् (Bachelor of Fine Arts) असा आहे. जर तुम्हाला चित्रकला( Drawing), नृत्य (Dance), अभिनय (Acting), शिल्प (sculpture) गायन (Singing), फोटोग्राफी ( Photography) या कलांची आवड असेल. या कला तुम्हाला अवगत असतील तर तूम्ही यात चांगल्याप्रकारे करिअर घडवू शकता. बी ए फ ( B.A.F) या कोर्स चा कालावधी हा ४ वर्षांचा असतो. हा कोर्स पुर्ण केल्यावर तुम्ही नोकरी अथवा स्वतंत्र व्यवसाय सुरु करु शकता.


👉🏻 *२) बी ए एम एम सी (B.A.M.M.C)*


▪️बी ए एम एम सी ( B.A.M.M.C) चा संपूर्ण फुल फॉर्म बॅचलर ऑफ आर्ट्स इन मल्टी मीडिया आणि मास कॅमुनिकेशन ( Bachelor of Arts in multimedia and mass communication) असा आहे. तुम्हाला जर पत्रकारिता तसेच जाहिराती या विषयांमध्ये रुची असेल तर हा अंडर ग्राजूएट कोर्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुम्हाला अभिनयाची, फोटोग्राफी, चित्रकला, याची देखील आवड असेल तरी तूम्ही यात चांगल्याप्रकारे करिअर घडवू शकता. या कोर्स चा कलावधी तीन वर्षांचा असतो.


👉🏻 *३) बी ए एल एल बी ( B.A.L.L.B)*


▪️१२ वी नंतर तुम्हाला कायद्याचा अभ्यास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा कोर्स करु शकता. या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला आधी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. यासाठी नॅशनल लॉ युनिवहर्सिटी तसेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या कडून या कोर्स साठी प्रवेश परीक्षा आयोजित केल्या जातात. या कोर्स चा कालावधी हा पाच वर्षांचा असतो.


👉🏻 *४) बी एच एम ( B.H.M)*


▪️बी एच एम म्हणजेच बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ( Bachelor Of Hotel Management). ह्या कोर्स चा कालावधी ३ वर्षांचा असतो. यामध्ये हॉस्पिटॅलिटी (Hospitality), टूरिझम इंडस्ट्री ( tourism industry) फूड इंडस्ट्री (Food Industry) असे अनेक विभाग उपलब्ध आहेत.

     

👉🏻 *५) बी इ एम ( B.E.M)*


▪️बी इ एम म्हणजेच बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट ( Bachelor of Event Management) ह्या कोर्स मध्ये सध्या भरपूर स्कोप (Scope) आहे. आजकल लग्न, बर्थ डे पार्टी, रिटायरमेंट पार्टी, त्याचबरोबर सामाजिक, राजकीय अश्या सगळ्याच कार्यक्रमासाठी इव्हेंट मॅनेजर ची गरज पडते.


👉🏻 *६) बी बी ए ( B.B.A)*


▪️बी बी ए म्हणजेच बॅचलर ऑफ बिझिनेस अडमिनिस्ट्रेशन (Bachelor of Business Administration). हा कोर्स आर्टस् शाखेतील १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील करता येतो. या कोर्स मुळे तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रात करियर बनविण्याची संधी मिळेल .

Thursday, May 4, 2023

पुणे. मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी चक्क बनला पोलीस , पण एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून तुम्हीही खूप हसाल

 मैत्रिणीला इंप्रेस करण्यासाठी चक्क बनला पोलीस , पण एका चुकीने पुरता फसला; घटना वाचून तुम्हीही खूप हसाल .

आजकाल स्वतःला वेगळे समजण्यासाठी किंवा मित्र व मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना पुण्यातील औंध परिसरातून समोर आली आहे. चक्क एक तरूण मित्र मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी पोलिसांचा ड्रेस घालून  फिरत होता. पण, त्याने अशी एक चूक केली आणि त्यांनतर पुर्णच प्लान फसला. या एका घटनेमुळे पुण्यातील औंध परिसरात खळबळ उडाली असून पुणे पोलीस तपास करत असल्याची माहिती , मिळाली आहे.

Pune_city_police_news
Pune city police news


      मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी पोलीस होण्याचं नाटकच केलं. त्याने यावेळी  पोलिसांचे कपडे घातले, टोपी घातली, बॅच लावल अगदी खर्या पोलिसांप्रमाणे मात्र पायात बूट घालण्याचं तो विसरलाच. पायात चप्पल घालून फिरत असल्याने पोलिसांनी त्याला पाहिले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता सगळं प्रकरण समोर आले. पोलिसांनी त्या तरुणाला विचारलं असता मी औंध पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असल्याचं सांगितलं. पण, त्याने जो ड्रेस घातला होता त्यावरून त्याचे  खरे पितळे उघडे पडले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

MAHARASHTRA POLICE NEW UPDATE TODAY 

   अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव - यशवंत रमेश धुरी ( वय ३०, रा. तापकीर गल्ली, नडे कॉलनी, काळेवाडी) असे आहे. या प्रकरणीची तक्रार पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले यांनी चतुष्रुंगी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुण्यातील औंध परिसरात असणार्‍या राम नदी पुलावर रविवारी घडला आहे.

याबाबत सदर पोलिसांनी अशी माहिती दिली की, पुण्यातील औंध परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी हे खाजगी वाहने  परिसरात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग करत असताना त्यांना राम नदीच्या पुलावर एक पोलीस उभा असल्याचे दिसले. त्यांना तो अनोळखी विचित्र वाटल्याने त्याला गाडी थांबवून विचारले. त्याने आपण औंध चौकीला पोलीस असल्याचे सांगितले. पण, पोलिसांना शंका आली. आपल्याच पोलीस चौकीतला पोलीस आणि आपल्यालाच माहित नाही.

पोलिसांनी त्याचे निरीक्षण केले तर त्याच्या अंगावर ड्रेस होता, पायात चप्पल होती मात्र त्याने जो ड्रेस घातला होता त्यावर म.पो. आणि टोपीवर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिलेले आढळले. त्यावरून तो खोटे बोलत असल्याचे त्यांना समजले. अधिक चौकशी केली असता तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून आपल्या मित्र आणि मैत्रिणींना इंप्रेस करण्यासाठी हा गणवेश घातल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याचा अधिक तपास चालू असल्याचं सांगण्यात आलं.