साबण व्यापाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमास जन्मठेप; २० हजार दंड
Google images
साबण व्यापाऱ्याचा खून करणाऱ्या नराधमास जन्मठेप; २० हजार दंड
पुणे : उसने दिलेले पैसे न दिल्यानेव्या पाऱ्याचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्याला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी सुनावली. दंडापैकी १० हजार रुपये मयताच्या कायदेशीर वारसाला देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.
सचिन येशूदास भालेराव (वय ३४, रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. साबणाचे व्यापारी प्रदीप ऊर्फ बाबू विरूमल हिंगोराणी (वय ५१,
रा. गुरुकृपा मार्केट, पिंपरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पिंपरी पोलिस स्टेशन येथे २ मे २०१८ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांनी १५ साक्षीदार तपासले. शिक्षेसाठी सीसीटीव्ही फुटेज, डॉक्टरांचा मृत्यूची वेळ सांगणारा अभिप्राय, पंचाची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावा महत्त्वाचा ठरला. पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक कोकाटे व हवालदार बी. टी. भोसले यांनी काम पाहिले. आरोपी भालेराव आर्थिक अडचणीत होता. त्याने ओळखीचे असलेले हिंगोराणी यांना उसने पैसे मागितले.
मात्र, त्यांनीपै से देण्यास नकार दिला. त्यामुळे राग आल्याने आरोपीने गळा आवळून हिंगोराणी यांचा खून केला. त्यांच्या
घराच्या कपाटातील रोख रक्कम घेऊन पसार झाल्याचे दोषारोपपत्रात नमूद केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने खुनाच्या कलमानुसार जन्मठेप व १० हजार रुपये दंड, पुरावा नष्ट करण्याच्या कलमानुसार ३ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड आणि चोरीच्या गुन्ह्यासाठी ५ वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायची आहे. दरम्यान, हिंगोराणी यांच्या घरातून चोरलेले ३८ हजार रुपये पोलिसांनी आरोपीकडून जप्त केले. ते हिंगोराणी यांच्या कायदेशीर वारसांना देण्यात यावेत, असेही म्हटले आहे.
No comments:
Post a Comment